Crop Insurance List वाढत्या हवामान बदलामुळे झालेल्या अतिवृष्टी, आवळे पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जात आहेत. या संकटावर मात करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
यातील महत्त्वाचा भाग म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई. अलीकडच्या काळात झालेल्या अतिवृष्टी, गारपीट आणि आवळ्या पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात येत आहे.
जानेवारी 2024 मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 144 कोटी रुपयांचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आले आहे, तर नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी 2109 कोटी रुपयांचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती. याशिवाय जानेवारी ते मे 2024 या कालावधीत झालेल्या गारपिटीसाठी शेतकऱ्यांना 596 कोटी रुपयांचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आले होते.
सद्य:स्थितीत राज्य शासनाने 26 जिल्ह्यामधील अतिवृष्टी, आवळे पाऊस, गारपीट इत्यादीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या जवळ-जवळ 3 लाख शेतकऱ्यांना 360 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मंजुरी दिली आहे. हा निर्णय 5 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात आला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील उस पिकावर डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी 31 शेतकऱ्यांना 1 लाख 97 हजार रुपयांचे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात एप्रिल-मे 2024 मध्ये बाधित झालेल्या 65 शेतकऱ्यांना 5 लाख 48 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील जून 2024 मध्ये गारपिटीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या 220 शेतकऱ्यांना 3 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तर अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांमधील मे 2024 मधील गारपिटीसाठी 2017 शेतकऱ्यांना 2 कोटी 70 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांतील एप्रिल 2024 मध्ये गारपिटीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या 71 हजार 81 शेतकऱ्यांना 87 कोटी 84 लाख रुपयांचे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमधील मे 2024 मधील गारपिटीसाठी 2137 शेतकऱ्यांना 4 कोटी 64 लाख 22 हजार रुपयांचे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांतील नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पावसासाठी 1 लाख 3 हजार 650 शेतकऱ्यांना 74 कोटी 64 लाख 85 हजार रुपयांचे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील डिसेंबर 2023 आणि ऑगस्ट/सप्टेंबर 2023 मधील बाधीत झालेल्या 6560 शेतकऱ्यांना 5 कोटी 39 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
एप्रिल 2024 मध्ये भंडारा जिल्ह्यातील 6063 शेतकऱ्यांना 7 कोटी 35 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांमधील मे 2024 मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 25 कोटी 60 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
वर्धा, गडचिरोली, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमधील जुलै 2024 मध्ये बाधित झालेल्या 2 लाख 23 हजार 827 शेतकऱ्यांना 203 कोटी 53 लाख रुपयाचे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तसेच ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील मे 2024 मध्ये बाधित झालेल्या 9 हजार 458 शेतकऱ्यांना 7 कोटी 54 लाख 43 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील एप्रिल 2024 मध्ये बाधित झालेल्या 14 शेतकऱ्यांना 61 हजार रुपयांचे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
अशा प्रकारे या मदतीचा लाभ राज्यातील 26 जिल्ह्यातील सुमारे 3 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. यासाठी राज्य शासनाने 360 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या सर्व उपाययोजनांमुळे गेल्या दोन वर्षांत नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना प्रभावी आर्थिक मदत दिली गेल्याचे दिसून येते. या मदतीचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळू लागल्याने ते मोठ्या उत्साहाने या योजनांचा लाभ घेत आहेत. हवामान बदलासह होणाऱ्या अतिवृष्टी, आवळ्या पावसा आणि गारपिटीला शेतकरी सामोरे जात असल्याने शासनाचा हा प्रयत्न खूप महत्त्वाचा ठरत आहे.