Advertisement

कर्मचाऱ्यांच्या पगारात शेवटी 6500 रुपयांची वाढ! सरकारने मान्य केल्या मोठ्या मागण्या Big demands accepted

Advertisement
शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

Big demands accepted एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एसटी कर्मचाऱ्यांसोबत एक बैठक पार पडली. या बैठकीत काही मागण्या मान्य करण्यात आल्या असून, विशेष म्हणजे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6,500 रुपयांची वाढ केली आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे ही महत्त्वाची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत एसटी कामगार संयुक्त कृती समितीचं शिष्टमंडळ सहभागी होतं. तसेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते, एसटी कष्टकरी जनसंघच्या जयश्री पाटील हे देखील उपस्थित होते.

Advertisement

राज्यभराचे लक्ष होतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एसटी कर्मचाऱ्यांची मनधरणी करण्यात यशस्वी होणार का? अखेर एकनाथ शिंदे यांनी या चर्चेतून मोठं यश मिळवलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी 5,000 रुपयांच्या वेतनवाढीची मागणी केली होती, परंतु सरकारने 6,500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा:
महिलांना सरकार देत आहे व्यवसाय करण्यासाठी 3 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज interest free loan

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मी मनापासून आभार मानतो.

Advertisement

आमची मागणी होती की महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार वेतन मिळावे. त्यासाठी सरकारने नेमलेल्या समितीने साडेपाच हजार रुपयांची वाढ करण्याची सूचना केली होती. आमची मागणी 5,000 रुपये वेतन वाढवण्याची होती, आणि सरकारने ती मागणी मान्य केली आहे.

ज्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2021 मध्ये 2,500, 4,000 आणि 5,000 रुपयांची वाढ मिळाली होती, त्यांना आता सरसकट 6,500 रुपयांची वेतनात वाढ देण्यात आली आहे,” अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली.

Advertisement
हे पण वाचा:
हे काम केलं तरच महिलांना मिळणार पुढील हफ्ता 3000 हजार रुपये Majhi Ladki Bahin Yojana

नेमकी पगारवाढ कशी झाली? “ज्यांना 2021 मध्ये 5,000 रुपयांची वाढ मिळाली होती, त्यांच्या पगारात आता 1,500 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच ज्यांना 4,000 रुपयांची वाढ मिळाली होती, त्यांच्या पगारात 2,500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ज्यांना 2,500 रुपयांची वाढ मिळाली होती, त्यांच्या पगारात 4,000 रुपयांची वाढ करण्यात

Advertisement

Leave a Comment

WhatsApp ग्रुप